Mumbai Local Video: मुंबई लोकल मधून थेट FOB वर चढण्यासाठी प्रवाशांचा भयंकर जुगाड; व्हिडिओ झाला वायरल (Watch Video)
प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणतेही स्टंट करू नयेत अशा सूचना वारंवार रेल्वे कडून दिल्या जातात. हा दंडनीय गुन्हा आहे.
मुंबई लोकल ही या शहराची प्रवाशांसाठी लाईफलाईन आहे. पण त्यामधून प्रवास करताना अनेक जण आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. सध्या सोशल मीडीयातही असाच एक तारीख, स्थळ नसलेला व्हिडिओ शेअर होत आहे. यामध्ये प्रवासी फूट ओव्हर ब्रीज वर उतरताना स्टंटबाजी करताना दिसत आहे. ब्रीज च्या बाजूच्या रेलिंगमधून अंगा आकसून लोकं आरपार जात असल्याचं दिसत आहे. 'Borivali Churchgate Bhajan'या इंस्टा पेज वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान एका युजरने हा प्रकार दादर स्थानकातील असल्याचं म्हटलं आहे.
ट्रेन मधून ब्रीजवर चढण्यासाठी स्टंटबाजी
View this post on Instagram
A post shared by Borivali Churchgate Bhajan (@borivali_churchgate_bhajan)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2024 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

