बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. या भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे.
पाहा शरद पवारांचे ट्विट -
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 1, 2023
बुलढाण्यातील अपघात हा दुर्दैवी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे . -
महाराष्ट्र के बुलढाणा जिले में हुआ सड़क हादसा हृदयविदारक है। दुःख की इस घड़ी में मेरी संवेदनाएं इस भीषण हादसे में जान गंवाने वाले लोगों के परिजनों के साथ हैं। प्रशासन द्वारा घायलों को त्वरित उपचार उपलब्ध कराया जा रहा है। ईश्वर से उनके शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) July 1, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी असल्याचे म्हटले आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2023
राहुल गांधी यांचे ट्वीट
महाराष्ट्र के बुलढाणा में हुई बस दुर्घटना का समाचार बहुत दुखद है।
इस कठिन समय में सभी शोकसंतप्त परिवारजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2023
नितिन गडकरी यांचे ट्वीट
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 1, 2023
उद्धव ठाकरे
बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला.हे वृत्त मन हेलावणारे आहे .गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत . आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले .सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) July 1, 2023
बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत . अपघातात जीव गमावलेल्या अभागी जिवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे 💐🙏
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) July 1, 2023
राज ठाकरे यांचे ट्वीट
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)