NEET Exam 2024: देशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील (National Eligibility cum Entrance Test) भ्रष्टाचाराकडे शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. NEET च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आलाच आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. हे भयंकर आहे.

देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि परिक्षांमधला भ्रष्टाचार ह्याचा फटका सामान्य घरातल्या मेहनती मुलांना बसतोय. भविष्य घडवण्यासाठी ही मुलं जीवापाड मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात, पण अनेकदा त्यांच्या नशीबी निराशाच येते. ना नोकऱ्या मिळतात, ना उच्च शिक्षणाच्या संधी. हे चित्र तातडीने बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायला हवा! केंद्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारने ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं.

आदित्य ठाकरे ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)