Maharani Tarabai Punyatithi: महाराणी ताराबाई यांचा जन्म 1675 साली मराठा सैन्यातील सर सेनापती हंबीराव मोहिते यांच्या घरी झाला. सर सेनापती हंबीराव मोहिते यांची त्या कन्या होत्या. 1684 मध्ये राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह होऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई झाल्या. राणी ताराबाई या अतिशय हुशार आणि लढवय्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी ताराबाई यांनी मराठा राज्याची सूत्रे हाती घेतली. आज महाराणी ताराबाई यांची पुण्यतिथी असून राज्यातील अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या स्मृतीस सोशल मीडियाद्वारे अभिवादन केलं आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले -
छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाई यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. pic.twitter.com/gUvrY02fME
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 9, 2022
चंद्रकांत पाटील -
मुघलांचा कर्दनकाळ ठरलेल्या कर्तृत्ववान योद्धा, स्वराज्यरक्षिका छत्रपती महाराणी ताराबाई यांची आज पुण्यतिथी! छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांच्यानंतर मराठा साम्राज्याला सावरून पराक्रम गाजवणाऱ्या महाराणी ताराबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा !#MaharaniTarabai pic.twitter.com/PhFQqZuB0x
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 9, 2022
राजन साळवी -
मुत्सद्दीपणा आणि कर्तबगारीच्या जोरावर मोगलांशी टक्कर देत ताराबाईंनी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील अनेक गड परत मिळवत पुन्हा स्वराज्याची घडी बसवणाऱ्या महाराणी ताराबाई ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... pic.twitter.com/qvNS2gU2rE
— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) December 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)