Makar Sankranti 2023 Bornahan: मकर संक्रांत हा वर्षातील पहिला महत्वाचा सण मानला जातो. बोरन्हाण, हळदी कुंकू, पतंगबाजी इत्यादीमुळे या सणाला आणखी रंगत येते आणि प्रत्येक जण हा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. दरम्यान, आज आपण बोरन्हाण विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.   मकर संक्रांतीच्या दिवसांत लहान मुलांचे 'बोरन्हाण' केले जाते. बोरन्हाणमध्ये लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून छान सजवले जाते. लहान मुलांचा बोरन्हाणचा समारंभ आयोजित केला जातो. दरम्यान, बोरन्हाणची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत, पाहा 

बोरन्हाण कधी केले जाते, जाणून घ्या 

संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात तुम्ही कधीही लहान मुलांना बोरन्हाण घालू शकता.

बोरन्हाण का घातले जाते, जाणून घ्या 

लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करण्यात येणारी पारंपारिक पद्धत म्हणजे बोरन्हाण आहे. मूल जन्माला आल्यानंतर येणा-या पहिल्या संक्रांतील लहान मुलांना बोरन्हाण घातलं जाते. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.

कसे करावे हे बोरन्हाण?

लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला. अन्य लहान मुलांना तसेच जवळच्या नातेवाईकांना या कार्यक्रमासाठी बोलवा. तुमच्या बाळाला पाटावर बसवा. नंतर लहान मुलाला ओवाळावे. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन ज्याचे बोरन्हाण करत करून ते बाळाच्या डोक्यावरुन ओतावे. त्यानंतर तेथे आलेल्या लहान मुलांनी ते बोरे, गोड- गोड उसाचे पेर, तिळाची बोरे, चॉकलेट्स उचलून खावीत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)