Maharashtra Din Wishes: आज महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिन साजरा होत आहे. बॉम्बे पुनर्रचना कायद्यांतर्गत 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा 1 मे 1960 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी लागू झाला, त्यामुळे तेव्हापासून दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा विशेष दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाशासाठी खूप महत्त्वाचा आहे. मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात 106 आंदोलक हुतात्मा झाले. 1 मे रोजी या हुतात्म्यांनाही आदरांजली वाहिली जाते.

तर या दिनाचे औचित्य साधत पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळी, मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा पोस्ट्स- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)