Birbhum Violence: बीरभूमच्या बोगतुई गावात झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने सभात्याग केला.
विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर, भाजपच्या आमदारांनी बोगटुईच्या मुद्द्यावर आंदोलन केले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये घुसले आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले. स्पीकर विमान बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना आपली जागा घेण्यास वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला.
#WestBengal | Ruckus in the Assembly over #BirbhumViolence
NDTV's Saurabh Gupta reports pic.twitter.com/nzKvjqTsHJ
— NDTV (@ndtv) March 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)