Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील दहेज येथील रासायनिक प्लांटमध्ये रविवारी विषारी वायूच्या गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, उत्पादन युनिटमधील पाईपमधून गळणाऱ्या विषारी धुराचा श्वास घेतल्यानंतर कामगार आधी बेशुद्ध पडले. चार कामगारांना तातडीने भरूच येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला, तर अन्य एकाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून घटनेची पुढील चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)