Telangana Stray Dogs killing Case: तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पोन्नकल गावात माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरून त्याच्या पाळीव कुत्र्याच्या (Pet Dog) मृत्यूच्या बदल्यात तब्बल 20 भटक्या कुत्र्यांना ठार केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एकाच्या कुत्र्याला भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dog) टोळीने जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रागाच्या भरात कुत्र्याच्या मालकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने एका पाठोपाठ एक अशा 20 भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केले. (हेही वाचा : Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये रहस्यमयी परिस्थितीत सापडला मृतदेह)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)