Maharashtra Assembly Election 2024: बारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे. विधानसभा (Maharashtra Assembly Election) लढतीत अजित पवारांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांचा निभाव लागेल का? अशी शंका होती. मात्र, यूगेंद्र पवार नवखे असल्याने ते जनतेचा विश्वस संपादन करण्यात अपयशी असल्याचे मानले जात आहे. दरम्यान अजित पवार यांच्या मोठ्या आघाडीनंतर त्यांच्या समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा केला जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)