Odd Even Will Not Be Implemented In Delhi: दिल्लीत आता सम-विषम लागू होणार नाही. 13 नोव्हेंबरपासून दिल्लीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू होणार होता. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिल्ली सरकारवर सोपवला होता. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, आता 13 नोव्हेंबरपासून सम-विषम लागू होणार नाही. सध्या विषम सम पुढे ढकलले आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी नमूद केलं की, प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा होताना दिसत आहे. AQI जो 450+ होता तो आता 300 च्या आसपास पोहोचला आहे. 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सम-विषम लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. दिवाळीनंतर पुन्हा विश्लेषण केले जाईल.
Environment Minister #GopalRai said the #oddeven car rationing scheme will not be implemented from November 13 to November 20 as there has been a significant improvement in #Delhi's #airquality due to rainhttps://t.co/VF5ax7EzRR
— The Telegraph (@ttindia) November 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)