रेवाडीतील धरुहेरा औद्योगिक परिसरात भीषण अपघात झाला आहे. लाईफ लाँग फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन 40 कामगार जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांना रेवाडी येथील सर शादीलाल ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल सर्जन डॉ. सुरेंद्र यादव म्हणतात, "रेवाडीच्या धरुहेरा येथील एका कारखान्यात बॉयलर फुटला आहे. आम्ही रुग्णालयांना सतर्क केले आहे. आम्ही कारखान्यात रुग्णवाहिका पाठवली आहे. अनेक जण भाजले आहेत. सुमारे 40 लोक जखमी झाले आहेत. . " एका गंभीर रुग्णाला रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)