Same-Sex Marriage: समलिंगी विवाहाच्या निर्णयाविरुद्धच्या पुनर्विचार याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. समलिंगी विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याने, मंगळवारी या याचिकेचा उल्लेख सीजेआय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केला आणि खुल्या न्यायालयात त्याची सुनावणी घेण्याची विनंतीही केली. मात्र, सीजेआय चंद्रचूड यांनी असे करता येणार नाही असे सांगितले. खंडपीठाचे म्हणणे आहे की, घटनापीठ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या गुणवत्तेचा विचार करेल, मात्र पुनर्विलोकन याचिकेवर चेंबरमध्ये निर्णय घेतला जातो. सीजेआय म्हणाले की, पुनर्विलोकन याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी करावी की नाही, हे देखील चेंबरमधील न्यायाधीश ठरवतात. पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी सीजेआय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत केली जाणार आहे. घटनापीठाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी समलिंगी विवाहाला मान्यता देण्याविरुद्ध निर्णय दिला होता. आता सीजेआय यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत बुधवारी दुपारी 1.30 वाजता चेंबर्समध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (हेही वाचा: Rat Found Alive in Chuteny: हैदराबादच्या JNTUH वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा! मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीत पडला जिवंत उंदीर, पाहा व्हिडीओ)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)