कडक उन्हामुळे पंजाब सरकारने राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या आहेत. उद्या 21 मे पासून उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार असून 30 जून पर्यंत सुरू राहणार आहेत. पंजाबमधील शाळांमध्ये याआधी उन्हाळ्याच्या सुट्या 1 जूनपासून सुरू होणार होत्या, मात्र उष्णतेच्या लाटेमुळे सर्व शाळा वेळेपूर्वी बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची भीती असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ते टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
Due to extreme heat in Punjab, the Punjab Government has declared summer vacations in government and private schools. The summer holidays will begin from tomorrow, 21st May, and will continue until 30th June. pic.twitter.com/HZQZ7Z93ma
— Gagandeep Singh (@Gagan4344) May 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)