झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील एका 18 वर्षीय व्यक्तीने इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी उंचावरून खोल पाण्यात उडी घेतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. तौसिफ या व्यक्तीने सोमवारी सायंकाळी सुमारे 100 फूट उंचीवरून खदान तलावात उडी मारली. तलावात आंघोळ करणाऱ्या त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.

त्यांनी स्थानिकांना आणि पोलिसांना सतर्क केले आणि शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)