लोकसभा सभागृहात सुरक्षेसंबंधी घडलेल्या गंभीर चुकीनंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी याबाबत सभागृहात माहिती देताना सांगितले की, आज घडलेली घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे आणि तीही गंभीर आहे. घडल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल.
दरम्यान, उद्या सकाळी 11.00 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. यापूर्वी 22 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना पंतप्रधानांनी आजच अभिवादन केले. धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी सुरक्षा भेदून अज्ञातांनी सभागृहात प्रवेश मिळवला. (हेही वाचा, Lok Sabha Security Breach: लोकसभा सभागृहात सुरक्षा भंग, Smoke Attack करत कामकाजात अडथळा; चौघांना अटक)
व्हिडिओ
#WATCH | Lok Sabha security breach | Lok Sabha Speaker Om Birla says, "The incident that happened today is a topic of concern for all of us & is serious as well...A high-level investigation is being done & accordingly action will be taken. A comprehensive review will be done… pic.twitter.com/S3SopKopWM
— ANI (@ANI) December 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)