या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि सभांमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सातत्याने देवाच्या नावाने मते मागत आहेत, तर दुसरीकडे एका विशिष्ट समाजाबाबत आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी डॉ. अभिषेक मनु सिंघवी, गुरदीप सप्पल आणि सुप्रिया श्रीनेट उपस्थित होते. भाजप नेत्यांशी संबंधित एकूण 16 तक्रारी निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)