‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवचा (Elvish Yadav) वैष्णोदेवीच्या येथील काही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, एल्विश यादव तेथील स्थानिक लोकांसोबत भांडताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक स्थानिक नागरिक एल्विशचा मित्र राघव शर्मा ह्याची कॉलर पकडून त्याच्यासोबत भांडताना दिसत आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनीही त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली. नंतर तो राघवला ढकलून निघून गेला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)