HC On Custody To Father: पाटणा उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर एखाद्या मुलीने तिच्या आईसोबत राहण्यास अस्वस्थता व्यक्त केली, तर तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात देणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती हरीश कुमार आणि आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निरीक्षण केलं. कोर्टाच्या पालकांच्या अधिकारक्षेत्राचा वापर करणार्या न्यायालयाला मुलाचे सुख, समाधान, आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, अनुकूल वातावरण इत्यादीकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे पालकत्व आणि संगोपनाच्या संदर्भात वडिलांचा दावा योग्य आहे की नाही हे ठरवताना त्यांनी अत्यंत सावधपणे नाजूक मार्गावर जावे लागते, असं न्यायालयाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Court Rejects Maintenance To Wife: पत्नी शिक्षित आणि नोकरी शोधण्यास सक्षम असेल तर पतीला भत्ता द्यावा लागणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
When Girl Child Doesn’t Appear To Be Comfortable With Mother, Necessary For Court To Consider & Grant Custody To Father: Patna High Court #ChildCustody https://t.co/viHFqhjapR
— Live Law (@LiveLawIndia) April 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)