आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना जेडीएस प्रमुख म्हणाले की, ते कर्नाटकात डाव्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतील. पुढील वर्षी 2024 मध्ये देशात निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत कोण कोणासोबत जायचे, कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आणि कोणत्या पक्षासोबत जाणार हे काही राजकीय पक्षांचे नेते आधीच जाहीर करत आहेत. जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी शनिवारी अशीच काहीशी घोषणा केली आणि लोकसभा निवडणुकीत ते डाव्या पक्षासोबत उभे राहणार असल्याचे सांगितले. हेही वाचा Mallikarjun Kharge On PM: काँग्रेस पक्षाने 70 वर्षांत काहीही केले नसते तर मोदी पंतप्रधान झाले नसते, मल्लिकार्जुन खर्गेंचे वक्तव्य
#WATCH | Bengaluru, Karnataka: "I'll stand with left parties in 2024 Lok Sabha elections," says JD(S) chief and former Prime Minister HD Devegowda#KarnatakaElections2023 pic.twitter.com/5PsWqg0K11
— ANI (@ANI) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)