CAT 2024 Result Declared: कॅट निकाल 2024 (CAT 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार iimcat.ac.in वर त्यांचे निकाल तपासू शकतात. कॅट स्कोअरकार्डमध्ये उमेदवाराचे नाव, क्रमांक, रँक, कॅट स्कोअर आणि एकूण टक्केवारी पाहता येईल. कॅट परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. देशभरातील 385 हून अधिक परीक्षा केंद्रांवर तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यापूर्वी, आयआयएम कलकत्ताने 3 डिसेंबर रोजी परीक्षेची तात्पुरती उत्तर की जारी केली होती, त्यानंतर अंतिम उत्तर की 17 डिसेंबर रोजी जारी करण्यात आली होती.

परीक्षेत बसण्यासाठी एकूण 3.29 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2.93 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. कॅट परीक्षेत बिहारमधील एका विद्यार्थ्याला 99.98 टक्के गुण मिळाले असून, 14 उमेदवारांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. देशभरात 21 आयआयएम आणि 1000 हून अधिक एमबीए संस्था आहेत, त्यामध्ये प्रवेश कॅट स्कोअरवर आधारित आहेत. (हेही वाचा: CUET-UG Update: आता 12 वी नंतर सीयूईटी यूजी परीक्षेसाठी विषयांचं बंधन नसेल; UGC ची माहिती)

असा पहा CAT 2024 चा निकाल-

कॅट निकाल 2024 चा निकाल ऑनलाइन मोडमध्ये तपासला जाऊ शकतो. यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात.

सर्वप्रथम iimcat.ac.in या वेबसाइटवर जा.

यानंतर होमपेजवर दिलेल्या 'स्कोअरकार्ड डाउनलोड' पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.

स्कोअरकार्ड तुमच्या स्क्रीनवर पीडीएफ स्वरूपात दिसेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)