दिल्लीतील आझाद मार्केट परिसरातील 5 दुकानांना आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. आझाद मार्केटमध्ये आज आग विझवताना सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमी सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आगीच्या ठिकाणी कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांना पाचारण करण्यात आले आहे. यासंदर्भात दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)