Bomb Threat Emails: जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत. यानंतर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमानतळावर बॉम्ब असल्याच्या ईमेलने सोमवारी अधिकाऱ्यांना गोंधळात टाकले. त्यानंतर परिसराची सुरक्षा वाढवण्यास सांगितले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पीटीआयशी बोलताना विमानतळ संचालक एस व्ही टी धनमजया राव म्हणाले की, त्यांच्या कार्यालयाला सकाळी विमानतळावर बॉम्ब असल्याची ईमेल प्राप्त झाले.  आम्ही आता अतिरिक्त खबरदारी घेत आहोत. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी, उड्डाण संचालनावर परिणाम होणार नाही, असं राव यांनी म्हटलं आहे. गोवा पोलिसांना विमानतळ अधिकाऱ्यांकडून औपचारिक तक्रार प्राप्त झाली असून बॉम्ब निकामी पथक परिसरात बॉम्बचा शोध घेत आहे.

Dabolim Airport in Goa is on high alert after receiving bomb threat email; authorities investigating origin of the message.https://t.co/56PApuMHkf

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)