Bomb Threat At Tuticorin Airport: तामिळनाडूतील तुतीकोरिन विमानतळाला (Tuticorin Airport) बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. या धमकीनंतर विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ई-मेलद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली होती. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर तुतीकोरिन विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळावर श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. तुतीकोरिन विमानतळाच्या प्रशासकीय कार्यालयाने सांगितले की, विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.

तुतीकोरिन विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)