सुजय डहाके यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर 'श्यामची आई' सिनेमा घेऊन येणार आहेत. या सिनेमाची पहिली झलक आता समोर आली आहे.  चित्रपटात अभिनेता ओम भूतकर साने गुरुजींची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट असणार आहे. 10 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असून सारंग साठ्ये, गौरी देशपांडे, मयूर मोरे, सुनिल अभ्यंकर, उर्मिला जगताप, संदीप पाठक या सिनेमामध्ये दिसणार आहेत. दरम्यान हा सिनेमा साने गुरूजींच्या कादंबरीवर आधारित आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)