Navra Maza Navsacha 2 Box Office Collections: ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा 2005 च्या मराठी हिट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सीक्वल सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 14.36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिनसह सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनादिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याची यशस्वी घोडदौड चालूच आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात नवस, बसचा प्रवास आणि या प्रवासातील मजेशीर घटना पाहायला मिळाल्या. आता दुसऱ्या भागात नवीन नवस आहे, पण प्रवास मात्र ट्रेनचा आहे. (हेही वाचा: Phullwanti Teaser Out: प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर रिलीज; पहा व्हिडिओ)

'नवरा माझा नवसाचा 2'ची बॉक्स ऑफिस यशस्वी घोडदौड सुरु-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)