Tiger Ka Message: सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'टायगर 3' चा टीझर समोर आला आहे. प्रेक्षकांना दिलेल्या शब्दांनुसार या पहिल्या टीझर मध्ये टायगरचा एक मेसेज समोर आला आहे. ज्यात 'टायगर'च्या पुढील प्रवासाचा अंदाज येत आहे. रॉ एजंट 'आशुतोष राठोड' अर्थात टायगर देशभक्त आहे की गद्दार? याचा खुलाशा भोवती या सिनेमाची पटकथा फिरताना दिसणार आहे. हा  अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान सोबत पुन्हा अभिनेत्री कटरिना कैफ यामध्ये दिसणार आहे. यश राज फिल्म्स च्या स्पाई यूनिवर्स  फ्रेंचाइजी चा हा तिसरा सिनेमा आहे. त्यामुळे यात 'पठाण' चाही  क्रॉस ओव्हर पाहता येणार आहे.

पहा टीझर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)