27, 28 जानेवारीला रात्री गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. या रंगारंग सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. द काश्मिर फाईल्स फेम विवेक अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कारांवर टिकास्त्र सोडलं आहे. विवेक अग्निहोत्रींनी ट्विट केलंय की, "सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तींसह संपूर्ण बॉलीवूडला फिल्मफेअर ॲवॉर्ड्समध्ये सहभाग घेण्यात काही विचित्र वाटत नाही, याचा मला जास्त त्रास होतो. ॲवॉर्ड शोमध्ये डान्स करुन हे कलाकार आपल्या कलेचा आदर करू शकत नाही. याशिवाय हा पुरस्कार सशुल्क पीआरसह दाखवून त्यांना लाज वाटत नाही. हे म्हणजे असं झालं की एखाद्या डेंटिस्टने आपल्या दवाखान्याची जाहिरात करण्यासाठी त्याचेच घाणेरडे दात दाखवले."

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)