केरळाचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी (Prakash Koleri) यांच्याविषयीची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचे निधन झाले असून घरातच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीतून सेलिब्रेटींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. प्रकाशजी यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी ‘मिजियिथलिल कन्नीरुमयी’ (1987) या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटाला जाणकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 2013 मध्ये आलेला ‘पट्टुपुष्ठकम’ हा शेवटचा चित्रपट होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)