सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक थ्रिलर-ड्रामा आहे, जो सत्य घटनांनी प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. ट्रेलरमध्ये, सारा अली खान एका धाडसी मुलीच्या भूमिकेत दिसत आहे, जी अंडरग्राउंड रेडिओचा वापर करून देशवासियांना एकत्र आणते आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात त्यांचे मनोबल वाढवते.

ट्रेलरमध्ये थ्रिल, देशभक्ती आणि ॲक्शन पहायला मिळणार आहे. सारा व्यतिरिक्त चित्रपटात रिचर्ड भक्ती क्लेन, ॲलेक्स ओ'नेल आणि इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कन्नन अय्यर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि कन्नन अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिले आहे. चित्रपटाची निर्मिती धर्मा एंटरटेनमेंट आणि करण जोहर यांनी केली आहे. हा चित्रपट 21 मार्च 2024 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)