Rituraj Singh Passes Away: अनुपमा फेम अभिनेता ऋतुराज सिंह यांचे 59 व्या वर्षी निधन झाले आहे. ऋतुराज सिंहचा जवळचा मित्र असलेल्या  अमित बहलने  ऋतुराज यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. ऋतुराज सिंहच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनुपमा या लोकप्रिय सिरीयल मधून अभिनेता अनेकांच्या घराघरात पोहोचला होता.  अभिनेता   ऋतुराज सिंह  यांनी  अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मावल्याचे समोर आले आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)