Viral: हॉटेलमध्ये साध्या भाताचे चक्क हजार रुपयांचे बिल, पैसे देताना कपलची लागली 'अशी' वाट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Viral: आपण एखाद्यावेळी डिनर किंवा लंचसाठी चविष्ट अशा रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन करतो. पण त्यादरम्यान आपण काही गोष्टी जरुर पाहतो जसे की, तेथील अंम्बिएन्स, फूड, फूडची चव किंवा प्रत्येक पदार्थासाठी किती पैसे आकारले जातात. मात्र काही रेस्टॉरंट किंमतीशिवाय आपले मेन्यू कार्ड ऑनलाईन स्वरुपात डिस्प्ले करतात. अशातच आता एक कपल बाहेर जेवणासाठी गेले असता त्यांनी ऑर्डर केलेल्या साध्या भातासाठी (Plain Rice) त्यांना चक्क हजार रुपयांचे बिल द्यावे लागले.(Naked Mother: आपल्या दोन मुलांसमोर नेहमी 'निर्वस्त्र' राहते ही महिला; सोशल मिडियावर केला खुलासा, होत आहे ट्रोल)

खरंतर प्रकरण हे सिंगापुर येथील आहे. एक कपल सुट्टी घालण्यासाठी सिंगापुरला आले होते. त्यावेळी त्यांनी खाण्यासाठी दोन वाटी भात मागविला. पण त्यावेळी त्याची किंमत पाहिली नाही आणि तो त्यांनी खाल्ला. परंतु खरी मजा तेव्हा आली जेव्हा त्यांच्या हातात वेटरने बिल आणून दिले.(Bizarre Nail Art: नेल आर्टिस्टने टॉर्टिला आणि कोथिंबीरच्या पानांचे केले मॅनिक्युअर, सोशल मीडियातील युजर्स संतापले)

दोन वाटी साध्या भाताची किंमत पाहून कपल चक्रावले. ही घटना सिंगापुर मधील मरीना बे सँड्स हॉटेल मधील आहे. कपलची त्या बिलाचे पैसे भरताना वाटच लागली. कारण हॉटेलने बिलात सर्विस चार्ज आणि टॅक्सचे सुद्धा पैसे वसूल केला होता. या प्रकाराचा त्यांनी अधिक खुलासा सुद्धा सोशल मीडियात केला.