Raj Thackera And Uddhav Thackeray | (Photo credit: Archived, edited, representative images)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहे. तसेच कोरोना विरोधातील लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आमच्यासोबत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विधानाने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहेत. आपली करोनासोबतची लढाई सुरुच आहे, आधी विषमतेसोबत होती आता विषाणूसोबत आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत असे म्हणत त्यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहे. महत्वाचे म्हणजे, देशातील लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवल्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे राज्यावर मोठे संकट वावरत आहे. या कठिण परिस्थितीत राज्य सरकारसोबत उभे राहणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज ठाकरे यांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. याआधी पार पडलेल्या अनेक व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काही सूचना देत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. हे देखील वाचा- Coronavirus Positive Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 18 जणांचा मृत्यू; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2684 वर पोहोचला

उद्धव ठाकरे यांचे फेसबूक लाईव्ह- 

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 10 हजार 815 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 353 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 189 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे. यात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यापैकी 259 जण कोरोनामुक्त झाले आहेत.