विश्वास नांगरे पाटील यांचा 'बाला' गाण्यावरील तुफान डान्स व्हायरल; जनतेला दिसले  पोलीस आयुक्तांचे वेगळेच रूप (Video)
विश्वास नांगरे पाटील (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिस्तप्रिय आणि न्यायला धरून वागणारे अशी ओळख असलेले, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांचे नाव आदराने घेतले जाते. नेहमी अगदी ठराविक चौकटीत राहणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क हाऊलफुल-4 सिनेमातील ‘बाला’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये पाटील यांच्यासोबत त्यांचे मित्रही डान्स करताना दिसत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंत डॅशिंग अशी प्रतिमा जनसामान्यांमध्ये होती, मात्र आता या व्हिडीओद्वारे त्यांचे एक वेगळे रूप लोकांच्या समोर आले आहे.

विश्वास नांगरे पाटील बाला डान्स -

हा व्हिडीओ पाटील यांच्या लग्न समारंभातील आहे. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या मित्रांसमवेत मनमुराद डान्स केला आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये कर्तृव्य बजावल्यानंतर नाशिकमध्ये पोलीस आयुक्तपदी नांगरे पाटील यांची निवड झाली आहे. सध्या नाशिकच्या गुन्हेगारांवर त्यांची चांगलीच दहशत बसली आहे. विश्वास नांगरे पाटील नाशिक येथे बदली होऊन आल्यावर, नाशिकच्या सराफ बाजारात 36 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे थेट पोलिस कंट्रोल रूमशी लिंक केले जाणार आहेत. (हेही वाचा: नाशिक: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घडवली 15 वर्ष दुरावलेल्या माय-लेकरांची भेट, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

याधीही अनेकवेळा पाटील यांच्या तडाखेबाज निर्णयाचे लोकानाकडून कोईतुक झाले आहे. अशीच भावना आता नाशिककरांची आहे.