शेतकरी (Photo Credits: Pixabay)

NDRF 2019 for Maharashtra: दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी आज केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह (Radha Mohan Singh) यांनी आज महाराष्ट्रासह (Maharashtra) अन्य सात राज्यांना दुष्काळ सह अन्य नैसर्गिक आपत्तींच्या निवारण्यासाठी मदत जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला 4 हजार 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने राज्यांना मदत देण्याबाबतचा हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

केद्र सरकारने हिमाचल प्रदेशला 317.44 कोटी, उत्तर प्रदेशला 191.73 कोटी, आंध्र प्रदेशला 900.40 कोटी, गुजरातला 127.60 कोटी, कर्नाटकला 949.49 कोटी तर पॉंडेचरीला 13.09 कोटींची मदत केली आहे.

महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे 7 हजार 950 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला होता मात्र त्यापैकी केंद्राकडून केवळ 4 हजार 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.