MLA Ganpat Gaikwad | (Photo Credits: Facebook)

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी (Ulhasnagar Firing Case) भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad ) यांच्यासह पाच आरोपींना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांना उल्हासनगर न्यायालयाने  14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ते पोलीस बंदोबस्तात कळवा येथील पोलीस कोठडीत होते.उल्हासनगर कोर्टात न्यायाधीश ए ए निकम यांनी ही शिक्षा सुनावली.

पाहा पोस्ट -

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आरोपीमध्ये स्वतः आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा,संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकरण संवेदनशील असल्याने ठाणे पोलीस आयुक्तानातून यासंबंधी आदेश काढण्यात आले आहेत.

दरम्यान शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिललाइन पोलीस कुठे कमी पडले? दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात कसे आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.