मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Aararkshan) मागणीवरून पुन्हा आक्रमक झाला आहे. एकीकडे आरक्षण प्रश्नी सरकार दरबारी हालचालींना वेग आला तर उपोषणादरम्यान प्रकृती ढासळत असल्याने कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जरांगेंच्या भेटीसाठी जालन्यात आले होते. त्यांचा मान राखत आपण 2 दिवस पाणी घेऊ असं जरांगेंनी जाहीर केले आहे. यामध्येच आज मुंबईत मातोश्री वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण प्रश्नी राज्यसरकार काय भूमिका घेणार? हे पाहू असं म्हणतात. हा आरक्षणाचा प्रश्न राज्यापेक्षा दिल्लीतून सुटणारा आहे त्यामुळे दिल्लीतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मोरारजी देसाई यांच्या गोळीबाराची चौकशीची आग्रही मागणी करताना नेहरूंसमोर जसा सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला होता तशी आग्रही मागणी राज्यातील मोदी सरकारच्या मंत्र्यांनी करत आपले राजीनामे द्यावेत. सोबत मोदी सरकारसमोर राज्यातील खासदारांनी एकजूट दाखवत आपले राजीनामे द्यावेत. असं म्हटलं आहे. Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी हेमंत गोडसे ते रमेश बोरनारे पहा कोणकोणत्या आमदार, खासदारांनी दिला राजीनामा!
मराठा आरक्षण प्रश्नी तरूणांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन
मराठा समाजातील तरूण आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहे. त्यांनी आत्महत्येसारखे टोक गाठू नये असं आवाहन देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना केले आहे. गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी आमदार- खासदार राजीनामा देत आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.