
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज ठाणे (Thane) येथील पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. राज्य सरकारवर जोरदा ठिका करताना ते म्हणाले, ठाणे आणि राज्यभरामध्ये गुंडगिरी सुरु आहे. कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. आता तर राज्यात महिला गुंडांकरवी हल्ले सुरु आहेत. हा केवळ सत्तेचा माज आहे. हा माज आणि गुंडगिरी आम्हीही एका क्षणात उखडून फेकू शकतो. केवळ ठाणेच काय महाराष्ट्रातूनही ही गुंडगिरी आम्ही उखडून फेकू शकतो, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले महिलांकरवी घरात घुसून हल्ले केले जात आहेत. आम्हालाही घरात घुसता येते. पण, तसे करुन राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवायची का? तुम्हाला ते चालणार आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाणे (Thane) येथे रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्लात त्या जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्री लाळघोटेपणा करत 'फडणविसी' करत फिरतो', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल)
आतापर्यंत राज्यात गुंडांच्या टोळ्या होत्या. पण आता ठाण्यात महिला गुंड तयार झाले आहेत का? म्हणजे शांत संयमी आणि सभ्य ठाणे आता महिला गुंडांचे ठाणे झाले आहे काय? असा जोरदार आणि वास्तवदर्शी सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सावरकरांच्या नावे यात्रा काढत बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचणारे मिंदे गटाच्या तोतयांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचेही उद्धव टाकरे म्हणाले.