मालवण मध्ये 9 पर्यटकांना वादळी वाऱ्याचा फटका; एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू तर एक गंभीर जखमी
मालवणमधील देवबाग संगम खाडीपात्रात आज सोसाट्याच्या वर सुटला असल्याने एक नौका कलंडली आणि नौकेतील 9 पर्यटक पाण्यात पडले. दरम्यान बचावकार्य करत 8 पर्यटकांचा जीव वाचवण्यात आला परंतु एका महिलेचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळाला. याच अवकाळी पाऊसाचा फटका बसला आहे मालवणमधील देवबाग तालुक्यात फिरायला गेलेल्या काही पर्यटकांना. मालवणमधील देवबाग संगम खाडीपात्रात आज सोसाट्याच्या वर सुटला असल्याने एक नौका कलंडली आणि नौकेतील 9 पर्यटक पाण्यात पडले. दरम्यान बचावकार्य करत 8 पर्यटकांचा जीव वाचवण्यात आला परंतु एका महिलेचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे.
त्यातील मृत महिलेचं नाव माया आनंद मोरे असून त्यांचं वय 60 वर्ष होतं आणि कल्याणमधील आंबिवली येथील रहिवाशी होत्या.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई जवळील कल्याण परिसरातील हा पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे फिरायला होता. परंतु आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नौकाविहार करत असताना हा अपघात घडला आहे.
सुखरूप असणाऱ्या पर्यटकांची नावे पुढील प्रमाणे आहेत,
लता बाळासाहेब शीलवंत (वय- ५७, रा. डोंबिवली मानपाडा)
नंदा विलास अडसुळे (वय- ५७, रा. बदलापूर)
विहान विशाल अडसुळे (वय- ३)
सांची विशाल अडसुळे (वय- ६)
स्वाती अडसुळे
अमित अडसुळे
संघमित्रा विशाल अडसुळे
'पवन' आणि 'अम्फन' चक्रीवादळामुळे मुंबई शहरात तसेच उपनगरांत मध्यम स्वरुपाचा पाऊस
स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत लगेच बचावकार्य सुरु केले व तातडीने सर्वांना मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचार सुरु करण्यापूर्वीच माया यांचा मृत्यू झाला. या अपघातात 3 वर्षीय लहान मुलगी देखील गंभीर रित्या जखमी झाली आहे.
दरम्यान काल रात्रीपासूनच कोकण किनारपट्टी व खाडीपट्ट्यात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2019 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

