Maharashtra Rain Update: कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नांदेडसह 'या' जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता- IMD
Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हैदोस घातला आहे. मे महिना संपण्याच्या आतच पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासांत कोल्हापूर, सातारा, सांगली, शोलापूर, पुणे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, वादळी वा-यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी येत्या 5 दिवसांसाठी डगडाटासह मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मोठ्या झाडांच्या जवळ वा आडोशाला उभे राहू नका असेही सांगण्यात आले आहे. वीज चमकत असताना उघड्या ठिकाणी उभे राहू नका.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Update: राज्यात दुपारी ऊनाचा कडाका तर संध्याकाळी पावसाचा तडाखा; 10 मे पर्यंत चालणार ऊन-पावसाचा खेळ

राज्यातील अनेक ठिकाणी आजही असाच पाऊस अपेक्षित आहे. काल रोहित पवार यांनी माहिती दिली होती की, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर कर्जत-जामखेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी.