Thane Tembhi Naka Devi Live Online Darshan 2020: भक्तांचे संकट दूर करणारी आणि त्यांच्या हाकेला धावणा-या देवीच्या नवरात्रोत्सव (Navratri 2020) सुरु झाला आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरसचे संकट देशावर घोंगावत असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करता येणार नसल्याने भाविकांची निराशा झाली आहे. म्हणून मंडळांनी प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करत अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मुंबईत अशी अनेक प्रसिद्ध मंडळे आहेत त्यातील ठाण्यातील टेंभी नाका (Thane Tembhi Naka Devi) परिसरातील देवी हे अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. दरवर्षी हजारो लोक या देवीच्या दर्शनासाठी ठाण्यात येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांचा जीव व्याकूळ झाला आहे.
अशा भाविकांनी काही एक चिंता करण्याची गरज नाही. भाविकांना घरात राहून देवीची लाईव्ह दर्शन घेता येईल. आणि लाईव्ह आरती पाहता येईल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हेदेखील वाचा- Navratri 2020 Songs: नवरात्री उत्सव साजरी करण्यासाठी या गाण्यांनी करा दिवसाची सुरुवात आणि देवी मातेच्या भक्तीत व्हा लीन!
Day 4 - 20th October 2020 | Thane Tembhi Naka Devi Live Darshan 2020
दरवर्षी या देवीच्या मंडपामध्ये कुमारीकांकडून तिचे पूजन केले जाते. पुढे षोडोपचार पूजा केल्यानंतर नऊ रात्र आणि दहा दिवस भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होते. नऊ दिवसात प्रत्येक तिथीच्या वेगवेगळ्या रुपाप्रमाणे देवीची पूजा करण्याची येथे प्रथा आहे.
नवरात्रोत्सवात ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील वातावरण काही औरच असते. सगळीकडे रोषणाई, मोठमोठ्या रांगोळ्या, दिव्यांची आरास, आकाश-पाळण्यासह छोटीशी जत्रा देखील आयोजित केली असते. या देवीच्या दर्शनासाठी दूरदूरवरुन भाविक दर्शनासाठी येतात. तसेच अनेक राजकारण, कला, क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असल्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने या देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र यंदा कोरोनामुळे दरवर्षी दिसणारा उत्साह यंदा पाहायला मिळत नाहीय. मात्र देवीची नित्यनियमाने पूजा-अर्चा केली जात आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन घरबसल्या देवीचे दर्शन घेणे योग्य राहिल.