Tata Mumbai Marathon 2019: आज मुंबईत 16 वी मॅरेथॉन स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये केनियाच्या कॉसमस लॅगटने (Cosmas Lagat) विजतेपद पटकावले. कॉसमनने 2 तास 9 मिनिटं आणि 12 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमू हिने विजेतेपदावर आपले नाव कोरले. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात नितेंद्र सिंग रावत याने बाजी मारली.
पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते
#1. केनियाचा कॉसमस लॅगट
#2. इथिओपियाचा ए बॅण्टी
#3. इथिओपियाचा शुमीट एकलन्यू
अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते
21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात श्रीनू मुगाता याने विजतेपद पटकावले. तर महिला गटात मीनू प्रजापती प्रथम आली. श्रीनू मुगाता यांना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एक तास पाच मिनिटांचा अवधी लागला. तर दुसरे स्थान पटकवणाऱ्या शिलॉंगच्या एस.थापा यांना एक तास सहा मिनिटे आणि 7 सेकंद इतका वेळ लागला. तर तिसरे स्थान पटकवलेल्या महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याला स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 1 तास, सहा मिनिटे आणि 38 सेकंदांचा अवधी लागला.
विजेत्यांना मिळाणारे बक्षीस
मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 45 हजार, 25 हजार आणि 17 हजार डॉलर तर पहिल्या तीन भारतीय विजेत्यांना अनुक्रमे पाच, चार आणि तीन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल; विशेष लोकल्स, बसेसची सुविधा
मेरी कोमचे फ्लॅगऑफ
मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अॅम्बेसेडर मेरी कोम हीने हिरवा झेंडा दाखवत मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अनेक धावपटू उत्सुक असतात. यंदा 50 हजार लोकांना या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पिटल- महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा या मॅरेथॉनचा मार्ग होता.