
पुण्यात स्वारगेट बस डेपो (Swargate Bus Depot) मध्ये एका तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर संताप व्यक्त होत असताना आता लवकरात लवकर आरोपीच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे ला शोधण्यासाठी 13 पथकं तैनात करण्यात आली असून आरोपीची माहिती देणार्याला रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा राहणारा आहे.शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार माऊली कटके (Mauli Katke) यांची प्रतिक्रिया यांच्यासोबत आरोपीचे फोटो समोर आल्याने या प्रकरणी राजकीय कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे.
माऊली कटके यांची प्रतिक्रिया
दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्सअॅप डीपी वर शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे. त्या वर प्रतिक्रिया देताना आमदार कटके यांनी आपण मतदारसंघात 10 हजाराहून अधिक लोकांना देवदर्शनाला नेले आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा-माझा संबंध नाही.असे स्पष्टीकरण कटके यांनी दिले आहे. (हेही वाचा: Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर).
राजकीय फ्लेक्सवर दत्तात्रय गाडे चा फोटो
शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या राजकीय फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडेचा फोटो दिसून आल्याने आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान त्याने विधानसभा निवडणूकीतही प्रचार केल्याची चर्चा आहे.