Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

आयएनएक्स मीडीया (INX Media)  प्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची आज (23 सप्टेंबर) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi) आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Dr Manmohan Singh)यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज नागपूरमध्ये मीडियाला प्रतिक्रिया देताना पी. चिदंबरम काही गुपितं उघड करतील या भीतीने किंवा मजबुरीने सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांनी चिदंबरम यांची भेट घेतली असावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चिदंबरम हे 5 सप्टेंबरपासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहेत. सध्या कोर्टाच्या आदेशानुसार त्यांची न्यायालयीन कोठडी 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मागील आठवड्यात कॉंग्रेस नेते गुलाम नबी आजाद, अहमद पटेल यांनी तिहार जेलमध्ये त्यांची भेट घेतली. दरम्यान या वेळेस पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम देखील उपस्थित होता. मागील काही दिवसांपासून पी. चिदंबरम यांची प्रकृती ढासळत आहे. त्यांच्या आरोग्याशी निगडीत काही समस्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मेडिकल सर्व्हिस आणि सप्लिमेंटरी डाएट देण्याची मागणी करण्यात आली होती.

ANI Twwet 

आयएनएक्स मीडिया ग्रुपला 2007मध्ये 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी मिळाला होता, या व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या काळात चिदंबरम हे अर्थमंत्री होते. सध्या सीबीआय आणि ईडी चिदंबरम यांची कसून चौकशी करत आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये चिदंबरम यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.