Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशातच सभा, प्रचार यांना सुरवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रचारसभे दरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपचे चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोदींच्या प्रचारसभेवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.  (हेही वाचा - Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी)

पाहा सचिन सावंत यांची पोस्ट -

 

सावंत यांच्या या पोस्टवर उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे सांगितले आहे. "आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर 100 मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या."

1984 साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. असे प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.