Eknath Shinde angry reaction on Swargate rape case (फोटो सौजन्य - Edited Image)

Swargate Bus Rape Case: स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये मंगळवारी बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 27 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध केला. यासंदंर्भात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, 'अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी. पुण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडले जाणार नाही. अशा लोकांना फाशी देण्यात यावी.'

पोलिस ठाण्याजवळ गुन्हा घडल्याने राज्यभरात संताप -

मंगळवारी पहाटे 5:45 ते 6 वाजेच्या दरम्यान पोलिस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही क्रूर घटना घडली. ज्यामुळे शहरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे अद्याप फरार असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. आरोपीचे यापूर्वी चोरी, दरोडा आणि साखळी हिसकावण्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. गाडे 2019 पासून जामिनावर बाहेर होता, असे एका पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा - Pune Swargate ST Bus Rape Case: स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणाने राज्यात संतापाचे वातावरण; फरार आरोपी Dattatray Gade ला पकडण्यासाठी एकूण 13 पथके तैनात)

एकनाथ शिंदे यांच्याकडून कठोर कारवाईचे आश्वासन -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून जुन्या बसेसचा लवकरच लिलाव करण्यात येईल, असं सांगितलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, पीडितेला जलद न्याय मिळावा यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव वाढत आहे. (हेही वाचा: Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर)

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथक तयार केली आहेत. पुणे बलात्कार प्रकरणामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होतं आहे. तथापी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुणे पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी आरोपी दत्तात्रय रामदास गाडेबद्दल माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.