Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेले काही दिवसांत ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या विविध घटना कानावर पडताना दिसत आहे. कुणाचा लग्न समारंभात तर कुणाचा मंदिरात, नाचताना, खेळतांना अचानक ह्रदयविकाराचा झटका येवून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.तसेच उच्च रक्तदाब किंवा संबंधीत कुठलाही अजार नसताना अनेकांना ह्रदविकाराचा झटका आल्याने मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. तरी या प्रकाराच्या ह्रदयविकाराचं प्रमाण तरुणांमध्ये अधिक आहे. देशभरातून या प्रकारच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. तरी आता नाशकातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी पूढे आली आहे. ज्यात एका तरुणाचा मैदानावर क्रिकेट खेळताना अचानक धाडकन कोसळून मृत्यू झाला आहे. तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तरुणास एकाऐकी ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांचं निदान आहे. तरी ह्रदयविकाराचा झटका येवून मृत विद्यार्थ्याचं वय ३२ वर्ष होतं.

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एनबीटी महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान क्रिकेटचा जोरदार सामना रंगला होता. तर खेळत असतानाचं विद्यार्थ्यास त्याची तब्येत जरा चिंताजनक वाटू लागली. दरम्यान त्याच्या मित्रांसह अन्य खेळाडूंनी त्याला नजिकच्या मेडिकल स्टोअरमधून गोळी आणून दिली. विद्यार्थ्याने ती गोळी घेतली आणि जरा वेळ आराम केला असता विद्यार्थ्यास बरं वाटू लागलं. नंतर त्याने खेळण्यास पुन्हा सुरुवात केली.

ह्रदयविकाराचा झटका आलेला विद्यार्थी गोलंदाज होता. उत्तम गोलंदाजी करत क्रिकेटचा सामना पार पडत होता. पण अचानकचं खेळत असताना विद्यार्थ्याच्या ह्रदयात चमक आली आणि बघता बघता तो लगेच खाली कोसळला. सोबतच्या खेळाडूंनी विद्यार्थ्यास ताबडतोब नजिकच्या इस्पितळात दाखल केल तोच डॉक्टरांनी विद्यार्थ्यास मृत घोषित केलं. तसेच अचानक आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितलं.