Jalgaon Sex Racket : जळगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दफाश; ६० तरूणींची सुटका, 10 महिलांसह 5 दलालांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

Jalgaon Sex Racket : जळगावमध्ये (Jalgaon) चोपडा पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दफाश केला आहे. तब्बल ६० पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे कुंटणखान्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुंटणखान्यावर धाड टाकली. या धाडीत एकूण ६० देहविक्री करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कुंटनखाना चालवणाऱ्या 11 महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा :Sex Racket In Pune: थाई महिलेद्वारे अपार्टमेंटमध्ये चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी दोन पीडितांची केली सुटका )

राज्यात गुन्हेरागीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात लहान मुले, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र देशाला आर्थिक दृष्या प्रबळ करतो. त्यामुळे देशभरातून अनेक महिला नोकरीच्या शोधात राज्यात येतात. मात्र, काही समाजकंटकांकडून महिलांचे शोषण होत असल्याच्या असंख्या घटना आजपर्यंत समोर आल्या आहेत. महिला सुरक्षेवर अनेक ठिकाणी राजकारणी भाषणं ठोकतात. महिलांना संरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे कायदे केले असं सांगतात. पण तरीही काही ठिकाणी महिलांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रीच्या अतिशय घाणेरड्या गर्तेत ढकललं जातं, हे या घटनेतून समोर आलं आहे. (हेही वाचा : Sex Racket: पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तीन महिलांची सुटका)

हा कुंटनखाना अवैधरित्या सुरू होता. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान, या महिला राज्यासह परराज्यातून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली त्यावेळी एकही गिऱ्हाईक त्यांनी आढळून नव्हते. मात्र, जेवढे लोक त्यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.