साताऱ्यातील (Satara) कोयना धरण (Koyana Dam) परिसरात भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती. (हेही वाचा - Earthquake in Chhattisgarh: छत्तिसगड बिलासपूरमध्ये रिश्टर स्केल 3.1 तीव्रतेचा भूकंप)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टिकरण धरण व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जानवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.