RTE Admission 2019 Maharashtra: आर्थिक दुर्बल घटकांमधील होतकरू विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये किंवा अद्ययावत प्रणालींचा वापर करून शिक्षण घेता यावं म्हणून शिक्षण हक्क कायदा (RTE) आणला. आता राज्यभर प्रवेशप्रक्रियेमध्ये 25% प्रवेश हे शिक्षण हक्क कायद्याखाली होतात. पुढील वर्षीच्या शालेय प्रवेशप्रकियेसाठी 25 फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज खुले होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात ऑनलाईन माध्यमातून प्रवेशअर्ज भरता येणार आहे.
कसं असेल RTE प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक
25- 11 मार्च 2019 - ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा
14 मार्च 2019 - पहिली लिस्ट
महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी 25% जागा मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांना राखीव असतात. या विशेष कोट्यातून प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षन पूर्णपणे मोफत मिळते. आवश्यक गणवेश, इतर साहित्य, पुस्तकं देखील शाळेकडूनच दिली जातात.rte25admission.maharashtra.gov.in वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध होईल.
शाळेपासून सुमारे 1-3 किलोमीटर अंतरामध्ये राहणार्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. पहिल्या फेरीमध्ये 1 किमीच्या आत आणि त्यानंतर दूर राहणार्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो.